आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात राज्यातील कचर्यात टाकाऊ विद्युत व इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे प्रमाण मोठे आहे.
या आगामी आव्हानाला सामोरे जाण्यासाठी गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ पिसुर्ले औद्योगिक वसाहतीत सामायिक ई-कचरा व्यवस्थापन सुविधा उभारण्याच्या प्रक्रियेत आहे. उत्पादने नष्ट करून डाउनस्ट्रीम रिसायकलर्सकडे पाठवावीत यासाठी राज्यांतर्गत विघटन सुविधा उभारण्याचा प्रस्ताव आहे. कंत्राटदार सर्व संबंधित भागधारकांना सामावून घेणारे जनजागृती उपक्रम तयार करेल आणि लागू नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार ई-कचर्यासाठी एक मजबूत संकलन आणि वाहतूक यंत्रणा देखील स्थापित करेल.